'हरिश्चंद्राची फॅक्टरी' ऑस्करमधून बाहेर
हरिश्चंद्राची फॅक्टरी हा सिनेमा ऑस्करच्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. भारतातर्फे हा सिनेमा ऑस्करसाठी ऑफिशियल एन्ट्री होती. पण ऑस्करसाठी शॉटलिस्ट झालेल्या निवडक सिनेमांच्या यादीतच त्याचा समावेश होऊ शकला नाही. भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या चरित्रावर आधारलेला हा सिनेमा येत्या 29 जानेवारीला रिलीज होत आहे. ऑस्करमधल्या परिक्षकांच्या या निर्णयाचं स्वागत करत यापुढे आणखी जोमानं काम करु असा, विश्वास हरिश्चंद्राच्या निर्मात्या दिग्दर्शकांनी आयबीएन-लोकमतशी बोलताना व्यक्त केला आहे.
![Reblog this post [with Zemanta]](http://img.zemanta.com/reblog_e.png?x-id=ef5e6701-e8a7-472c-990d-ae8867987026)